नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे.
महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन 1971 मध्ये झाली असून
या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा विभागामार्फत आपले स्वागत आहे. महाराष्ट्राच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयाची स्थापना सन १९७१ मध्ये झाली असून या क्रीडा संचालनालयामार्फत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे माध्यमातून जिल्ह्यात शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन व राज्याच्या क्रीडा विकासाशी निगडित योजनांची अंमलबजावणी करण्याचे काम करण्यात येते. राज्य शासनामार्फत क्रीडा विकासाकरीता राज्य व जिल्हा स्तरावर अनेक योजना / उपक्रम राबविण्यात येतात. या योजना / उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून करण्यात येते. क्रीडा ही मानवास प्राप्त झालेली निसर्गदत्त देणगी आहे. प्रत्येक मनुष्य हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे क्रीडा क्षेत्राशी जुळलेला असतो. काही जण थेट स्वरूपात तर काही जण सहाय्य करण्याच्या भूमिकेतून या क्षेत्राशी निगडित झालेले असतात. त्यामुळे क्रीडा क्षेत्रातील अद्यावत माहिती प्रत्येकापर्यंत उपलब्ध करून देण्याचा हा एक प्रयत्न आहे. नाशिक जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील घडामोडी, विविध स्पर्धा, नामवंत खेळाडू, पुरस्कारार्थी, क्रीडा सुविधा इ. माहिती सर्वसामान्य लोकांपुढे सादर करतांना अत्यंत आनंद होतो आहे. या माध्यमातून आपला जिल्हा क्रीडा क्षेत्रात काय करतो आहे याचे चित्र उभे करणे सुलभ होणार आहे. तसेच, आपल्या जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात असलेल्या उणीवा भरून काढण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करता येणे शक्य होणार आहे. शासनामार्फत क्रीडा क्षेत्रासाठी असलेल्या योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीचा आढावा देखील या माध्यमातून घेता येणे शक्य होणार आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय करीत असलेले काम व शासनाच्या विविध योजना तसेच नाशिक जिल्ह्याची क्रीडा विषयक सद्यस्थिती सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे